हार्ट अटॅक टाळायचाय? मग हे नक्की करा

तज्ज्ञांच्या मते सायकलिंगमुळे हार्ट अटॅक 7 टक्के टाळता येऊ शकतो. ‘द डॅनिश’ स्टडीने 50 ते 65 या वयोगटातल्या 45,000 लोकांची चाचणी केली. ज्यामध्ये असं आढळून आलं की दररोज केलेल्या व्यायामाचा शरीरावर खूप मोठा परिणाम होतो, पण हा व्यायाम रोज असलाच पाहिजे.

सोर्स-गुगल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हार्ट अटॅक टाळायचाय? मग हे नक्की करा

सोर्स-गुगल

धावपळ, ताणतणाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. परिणामी हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हृदयविकार टाळता येणे हे आता तुमच्या हातात आहे. कसं?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायकलिंग केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. पण, आठवड्याला फक्त तीस मिनिट व्यायाम केला, तर पुढच्या २० वर्षांत हृदयसंबंधित आजारी अधिक बळवण्याची शक्यता आहे.  या संशोधनासाठी ‘द डॅनिश’ स्टडीने ४५,००० लोकांचा अभ्यास केला.  ५० ते ६५ वयोगटातील लोकं दररोज काय करतात, काय करत नाहीत यावर २० वर्ष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की व्यायामाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, पण व्यायाम हा नियमित करणं तितकंच गरजेचं आहे.

ज्या व्यक्ती, एका आठवड्यात ९० मिनिटे सायकलिंग करतात, त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोग होण्याची शक्यता २४ टक्क्यांनी कमी होते. पण जे लोकं एका आठवड्यात फक्त अर्धातास म्हणजे तीस मिनिटं सायकल चालवतात त्यांनादेखील हृदयरोग होण्याची शक्यता १६ टक्के कमी असते. एनएचएसच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी आठवड्याला १५० मिनिटं चालणं किंवा सायकलिंग सारखा व्यायाम केला पाहीजे, किंवा ७५ मिनिटं जॉगिंग आणि फुटबॉलसारखे खेळ खेळायला हवेत. पण अनेक लोकं व्यायाम करत नाहीत, त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहसारख्या आजारांची लागण होते.

सोर्स-गुगल

आरोग्याबाबत सल्ला देणारे तज्ज्ञ, लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी लोकं जिमकडे वळत आहेत. पण त्याचा तितकासा चांगला परिणाम शरीरावर होत नाही. तज्ज्ञांच्या मते, लोकांनी आपल्या दैनंदिन वेळापत्रकात एखादा मैदानी खेळ, योगा, ध्यान यासारखे व्यायाम करा जे तुम्हाला अगदी सहज करता येऊ शकतील. जेणेकरुन शरीरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेनमार्कचे डॉ. आंद्रेस यांच्या म्हणण्यानुसार, व्यायामासाठी रोज वेळ काढणे हे काही लोकांना शक्य नसते, किंवा त्यांच्यासमोर वेळ कसा काढायचा हा प्रश्न असतो. पण निदान हृदयरोग टाळण्यासाठी लोकांना वेळात वेळ काढून सायकलिंग करावं, असं आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ. आंद्रेस आणि त्यांच्या टीमने त्यांचा हे संशोधन, सर्क्युलेशन मेडिकल जर्नलमध्ये लोकांसमोर मांडले. व्यायामाचा शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांनी १९९३ ते २०१३ या काळात ४५,००० लोकांचा अभ्यास केला. याच काळात २८९२ लोकांना हृदयविकाराचा झटका आला. यातील ७ टक्के लोकं नियमित सायकल चालवून हृदयविकाराचा झटका टाळू शकले असते, असे मत डॉ. आंद्रेस यांनी अभ्यासावरुन मांडले. रोज सायकलने ऑफिसला जाणा-यांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता १९ टक्क्यांनी कमी झाली. पण ज्यांनी सायकलिंग १९९३ पासूनच्या पहिल्या पाच वर्षात करायला सुरूवात केली त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता २४ टक्क्यांनी कमी झाली.

सोर्स-गुगल

डॉ. कीम ब्लाँड यांच्या माहितीनुसार, ऑफिसला जाण्यासाठी किंवा खेळ म्हणून सायकलिंग म्हणजे एक अत्यंत सोपा व्यायाम आहे. या रिसर्चनंतर हृदयरोग टाळण्यासाठी सरकारी पातळीवर सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला सुरुवात केलीय आहे.

आणखी एका संशोधनात, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसला सायकलिंग करून जाणा-या लोकांना हृदयरोगाची शक्यता कमी असते. त्याचसोबत लठ्ठपण, उच्च रक्तदाब, शरीरात चरबी वाढण्याचे प्रमाण  आणि मधुमेह असे आजार होण्याचे प्रमाणही कमी होतात. स्वीडनच्या लुंड युनिव्हर्सिटीने ४०, ५० आणि ६० वर्षाच्या २०,००० लोकांचा १० वर्ष अभ्यास केला. या अभ्यासानुसार, १५ टक्के लोकांना लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. तर, १३ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास, १५ टक्के लोकांना कॉलेस्ट्रोलचा त्रास तर  १२ टक्के लोकांना मधुमेहसारखे आजार होण्याची शक्यता कमी असते, असे मांडण्यात आले.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter