#WorldWaterDay पाणी प्यायल्याने शरीराला होणारे फायदे

शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पचन क्रिया, अन्न शोषण प्रक्रिया, लाळ निर्मिती, जीवनसत्वांना शरीरात पोहचवण्याचे काम, आदींमध्ये पाण्याचा सहभाग महत्वपूर्ण असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पाणी हे जीवन आहे. आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलाय. शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पचन क्रिया, अन्न शोषण प्रक्रिया, लाळ निर्मिती, जीवनसत्वांना शरीरात पोहचवण्याचे काम, आदींमध्ये पाण्याचा सहभाग महत्वपूर्ण असतो. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आम्ही उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

अवयवांना उत्तम कार्यरत ठेवण्यासाठी

सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरातील नकोसे घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होते. शिवाय पाण्यामुळे आपण घेत असलेली पोषक द्रव्य शरीर जलदगतीने शोषून घेतं. शरीरातील मुख्य अवयवांना पाणी हायड्रेट ठेवतं ज्यामुळे त्यांचं कार्य योग्यरित्या पार पडण्यास मदत होते

पचनक्रिया सुधारते

पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना जठरासंबंधी समस्या असतात त्यांनी उपाशी पोटी ३ ग्लास पाणी प्यायल्यास फायदा होतो आणि अॅसिडीटी कमी होण्यासही मदत होते.

वजन कमी होण्यास मदत

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डाएट करतात. जर डायट करण्यासोबत सकाळी पाणी प्यायल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते. कारण पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॅलरीज नसतात. पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया जलद गतीने होते आणि शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

मायग्रेनचा त्रास कमी होतो

आजकाल अनेकांना मायग्रेनचा त्रास असतो. अनेकदा शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्यास डोकेदुखीची समस्या शक्यतो उद्भवत नाही.

आतड्यांचं कार्य सुधारतं

शरीतातील आतड्यांमध्ये जमा होणारे नकोसे घटक पाण्याच्या सेवनाने निघून जातात. शिवाय यामुळे तुम्हाला भूकही भरपूर प्रमाणात लागते.

त्वचेसाठी उपयुक्त

त्वचेसाठी देखील पाणी पिणं फायदेशीर ठरतं. दररोज सकाळी उपाशी पोटी २ ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार दिसते. शिवाय त्वचा सुरकुतणे किंवा पुरळ येण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)