औषधी वनस्पतींच्या संशोधनासाठी राज्य सरकार सहकार्य करणार, मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील औषधी वनस्पतीची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता आणि वनस्पतीच्या संकलनाचं उत्तम काम राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगानं केले आहे. औषधी वनस्पती शोधून योग्य पद्धतीनं त्याचं संकलन करून त्यावर संशोधन करणं, याबाबत आयोगाला राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

‘आयुर्वेदिक औषधांना जीएसटीतून वगळा’, आयुर्वेदिक औषध उत्पादकांची मागणी
सोर्स- वेदानेट
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन आणि डेटाबेसचं अनावरणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगातंर्गत या विविध औषधी वनस्पतींच्या संकलन ठेवण्याचं समन्वयाचे काम पुण्यातील आघारकर संशोधन आणि अन्य १४ संस्थांनी केलं आहे. तब्बल चार वर्ष यासंदर्भात अभ्यास करून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सुमारे २०० क्षेत्रीय विद्यार्थी क्षेत्रीय कार्यात सहभागी झाल होते.

या डेटाबेसमध्ये ४०० वनस्पतीची विविधता आणि उपलब्धता, १५७ महत्वाच्या वनस्पतीची सांख्यिकी माहिती,  २५३ वनस्पतीची औषधी उपयोग विषयीची माहिती, वनस्पतीची बाजारातील उपलब्धता आणि उद्योगातील वापर या विषयीची माहिती दिली आहे.

“औषधी वनस्पतीचा हा डेटा बेस वापरण्यात सोपा असून औषधी वनस्पतीचा वापर करणारे, त्यावर संशोधन करणारे आणि अन्य इच्छुक यांनाही उपयुक्त ठरेल,” असं मत आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

या डेटा बेसवर आधारित “महाराष्ट्रातील महत्वाच्या औषधी वनस्पती” हे पुस्तक आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. अनुराधा उपाध्ये आणि डॉ. विनेया घाटे यांनी लिहिलंय. त्याचं प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter