जागतिक टीबी दिन- टीबी रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा देखील एक पर्याय

जागतिक क्षयरोग दिनाचं औचित्य साधून टीबी रुग्णांवर शस्त्रक्रिया हा पर्याय कसा फायदेशीर ठरू शकतो यासंदर्भात माय मेडिकल मंत्राने शिवडीच्या क्षय रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार आनंदे यांच्याशी चर्चा केलीये.

0
34
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • भारतात दरवर्षी ४ लाख लोकांचा टीबीमुळे मृत्यू
  • २९ लाख नवीन प्रकरणं दरवर्षी समोर येतात
  • टीबीमुळे देशाचं वर्षाला २० हजार कोटी रूपयांचं नुकसान
  • पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या टीबी मोहिमेकडे लक्ष देण्याच्या सूचना

मल्टी ड्रग रेझिस्टंट म्हणजेच एमडीआर टीबीमध्ये औषध देऊनही रुग्ण बरा होत नसल्यास यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. परंतु,  टीबी रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार आहे याबाबत अनेक डॉक्टरांना माहितीही नाही. जागतिक क्षयरोग दिनाचं औचित्य साधून टीबी रुग्णांवर शस्त्रक्रिया हा पर्याय कसा फायदेशीर ठरू शकतो यासंदर्भात माय मेडिकल मंत्राने शिवडीच्या टीबी रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार आनंदे यांच्याशी चर्चा केलीये.

माय मेडिकल मंत्रा- भारतात दिवसेंदिवस टीबीचे रुग्ण वाढतायत तर टीबीमुक्तीसाठी सरकारचे प्रयत्न कमी पडतायत का?

डॉ. ललितकुमार आनंदे– अनेक वर्षांपासून हा टीबीचा विषाणू समाजात तग धरून बसलाय त्यामुळे त्यावर मात करणं अवघड झालंय. याकरता प्रत्येक व्यक्तीने हा आजार आपल्याला होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. शिवाय लोकांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल यावर सरकारनं भर देणं गरजेचं आहे. कारण टीबीच्या विषाणूवर मात करणं हे खूपच अवघड आहे.

माय मेडिकल मंत्रा- टीबी रुग्णांच्या या वाढत्या संख्येवर कशा प्रकारे मात करता येऊ शकते?

डॉ. ललितकुमार आनंदे – टीबी होणं हे व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर खूप अवलंबून असतं. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की टीबी होण्याची शक्यता असते. यासाठी प्रत्येकाने पौष्टीक आहार घेतला पाहिजे जेणेकरून प्रकृती उत्तम असल्यास अशा गंभीर आजाराची लागण होणार नाही.

माय मेडिकल मंत्रा- क्षयरुग्णांवर औषधांशिवाय आणखी कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत?

डॉ. ललितकुमार आनंदे – फुफ्फुसाच्या टीबी रुग्णांना औषधोपचारनं बरं करता येतं. मात्र टीबी रुग्ण जर औषधांनी बरा होत नसेल तर त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. अनेक डॉक्टरांना या शस्त्रक्रियेबाबत माहिती नाहीये. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं असते.

माय मेडिकल मंत्रा- टीबी रूग्णावर कोणती शस्त्रक्रिया करण्यात येते आणि ती कशाप्रकारे केली जाते?

डॉ. ललितकुमार आनंदे – ‘व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक’ (व्हॅट्स) असं या शस्त्रक्रियेचं नाव आहे. अनेकदा टीबी फुफ्फुसात आणि बरगड्यांमध्ये पू जमा होतो. यामुळे फुफ्फुसाचा भाग एकमेकांना चिकटतो. त्यामुऴे यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. वेळेवर उपचार न झाल्यास अनेकदा रुग्णाच्या खोकल्यातून तोंडाद्वारे रक्त येऊ लागतं. अशावेळी या शस्त्रक्रियेच्य़ा माध्यमातून यकृताच्या वरच्या भागात दीड ते तीन सेंटिमीटरचं छिद्र केलं जातं. यातून एक ट्यूब फुफ्फुसात टाकून रक्त किंवा पू बाहेर काढला जातो. ही शस्त्रक्रिया खूप सोपी असते मात्र यावेळी रक्तवाहिन्या, हृदय आणि फुफ्फुसाला इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.

माय मेडिकल मंत्रा- टीबीच्या रुग्णांसाठी औषधं उपलब्ध आहेत का?

डॉ. ललितकुमार आनंदे – क्षयाच्या विषाणूंना कुठलंही औषध दाद देत नाही. यासंदर्भात अनेक संशोधनं अजूनही सुरू आहेत. ‘बेडाक्युलिन’ हे औषध टीबीसाठी उपलब्ध आहे. पण अजून या औषधांचं क्लिनिकल ट्रायल सुरूये. या औषधांच पेटंट मिळायचं बाकी आहे. मात्र, त्यानंतर हे औषधाची किंमत वाढेल.

माय मेडिकल मंत्रा- सरकारचं स्वप्न आहे की २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करायचं. सरकारचं हे स्वप्न साकार होईल असं वाटतं का?

डॉ. ललितकुमार आनंदे – २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. तर दुसरीकडे टीबीरुग्णांसाठी असलेली औषध विषाणूंना दाद देत नाहीत. असं असताना क्षयमुक्तीचं हे स्वप्न कसं साकार होईल हा प्रश्नच आहे. मात्र यासाठी फक्त सरकारचं नव्हेतर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अपेक्षित आहे. व्यक्तींनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘सी जीवनसत्त्वं’ असलेले पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा. असं झाल्यास भविष्यात क्षयमुक्त भारत आपण घडवू शकतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)