सुक्या मेव्यातील खजुराला पूर्ण अन्न म्हटले जाते. खजुरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजुराला पूर्ण अन्न म्हटले जाते. उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात तयार होणारा खजूर उष्ण असल्याचा सर्वांचा समज आहे. मात्र, खजूर वात आणि पित्तशामक आहे. तसेच पचण्यास हलका आहे. खजुरात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्व आणि लोह आहे. तसेच त्यात शर्करासुद्धा आहे.
खजूर खाल्ल्याने शरीरात ताजेपणा येतो, तसेच वजनही वाढते. खजुराने तारुण्य वाढते असेही म्हणतात. खरेतर खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. ज्यांना १०० वर्षे जगण्याची इच्छा आहे, त्यांना खजूर नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
- खजूर खाण्यामुळे मेंदू, हृदय, कंबर, वृक्क हे अवयव अधिक बलवान होतात.
- नुकताच तापातून उठलेल्या रुग्णाला खजुराचे सरबत दिल्यास ताकद वाढते.
- वजन कमी असलेल्या लहान मुलांना रोज २ खजूर खाण्यास द्यावे.
- खजुराबरोबरच बियांचाही वापर तापावर उपचार म्हणून करता येतो.
- अंगावर उठलेले व्रण, फोड, त्वचाविकार घालवण्यासाठी किंवा त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी खजुराची बी उगळून लावावी.
- खजुराचे तेलंही अतिशय शांत असते. यामुळे शरीरातील, मेंदूतील उष्णता कमी होते.