अल्झायमर्सचा धोका टाळण्यासाठी हळद उपयुक्त

नवीन एका अभ्यासानुसार वयोमानानुसार स्मरणशक्ती कमी होण्यासाठी हळद उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलंय. संशोधकांच्या सांगण्यानुसार, हळदीत कक्र्यूमिन हा घटक असतो. आणि हा घटक मेंदूच्या कार्यक्षमतेला फायदेशीर असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हळद ही आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळते. आजीच्या काळापासून आपण हळदीचे अनेक फायदे ऐकत आलोय. मात्र नुकत्याच केलेल्य एक संशोधनानुसार हळदीच्या सेवनाचा सर्वात मोठा फायदा लक्षात आलाय. हळदीच्या सेवनाने अल्झायमर्स म्हणजे स्मृतीभ्रंशाचा धोका कित्येक पटीने कमी होत असल्याचं समोर आलंय.

‘गेरिअट्रीक सायकियाट्री’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, वयोमानानुसार स्मरणशक्ती कमी होण्यासाठी हळद उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलंय.

या अभ्यासातून अल्झायमर नसलेल्या व्यक्तींवर हळदीमुळे होणारे परिणाम तपासण्यात आले. त्याचप्रमाणे अल्झायमर्स असणाऱ्या लोकांवरही हळदीच्या सेवनाने काय परिणाम होतो हे पडताळण्यात आलं.

हे संशोधन करण्यासाठी ५० ते ९० या वयोगटांतील ४० व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींऩा १८ महिन्यांसाठी दिवसातून दोन वेळा ९० मिलीग्रॅम हळदीचे सेवन करण्यास सांगण्यात आलं. शिवाय दर सहा महिन्यांनी या व्यक्तींच्या स्मृतीची चाचणी करण्यात आली.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, हळदीत कक्र्यूमिन हा घटक असतो. हा घटक अॅन्टीऑक्सिडण्ट असल्याचे संशोधकांनी केलेल्या चाचण्यांमध्ये आढळून आलं.

संशोधनाच्या अखेरीस असं समजलं की, हळदीचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणशक्तीत आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत वाढ झालीये. हळदीचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या स्मृतीमध्ये १८ महिन्यात २८ टक्क्यांनी सुधारणा झाली होती.

या संशोधनाचे अभ्यासक आणि कालिफोर्निया विद्यापीठाचे गॅरी स्मॉल यांच्या सांगण्यानुसार, “हळदीतील कक्र्यूमिन हा घटक नेमका कसा परिणाम करतो हे अजून स्पष्ठ झालेलं नाहीये. याबाबत आम्ही संशोधन कऱणार आहोत. कक्र्यूमिन हा घटक मेंदूच्या कार्यक्षमतेला फायदेशीर आहे. त्यामुळे व्यक्तींनी त्यांच्या आहारात हळदीचा वापर केला पाहिजे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter