ग्रामीण भागात हृदयरोगाचं निदान स्वस्त, भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या शास्ज्ञज्ञांनी तयार केलं पोर्टेबल ईसीजी मशिन

भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच बार्कच्या, वैज्ञानिकांनी क्रेडीट कार्डच्या आकाराच टेली ECG (ईसीजी) मशिन तयार केलयं. ज्याच्या माध्यमातून हृदयाच्या ठोक्यांबाबतची माहिती मोबाईल फोनवर मिळू शकते. १२ चॅनलच्या या ECG (ईसीजी) मशिनची किंमत फक्त ४ हजार रूपये आहे. ईसीजी तपासण्यासाठी हे सर्वात छोट मशिन आहे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

 

टीम एमएमएम

भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येतात शास्त्रज्ञ, जे त्यांचा बहुतांश वेळ अणवस्त्रांच्या संशोधनातच घालवतात. पण, बार्कच्या काही शास्त्रज्ञांनी लोकांचे जीव वेळेत वाचवेत या धैय्याने एक आगळं-वेगळं मशिन तयार केलं. या मशिनची किंमतही फार जास्त नाहीये, त्यामुळे ज्याठिकाणी आरोग्याच्या सोयी-सुविधा लवकर पोहोचत नाहीत, अशा अतिदुर्गम भागातही लोकांना या मशिनच्या वापराने हृदय विकाराचा झटका आला का नाही, याची माहिती मिळू शकेल.

देशात, प्रत्येक तीस सेकंदाला एका व्यक्तिचा हृदय विकाराच्या आजाराने किंवा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. देशातल्या मेट्रो शहरांमध्ये, आणि शहरी भागात आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पण, अजूनही देशातल्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात, ‘इलेक्ट्रो-कार्डियोग्राम’ म्हणजे ईसीजी मिशन उपलब्ध नाहीत, तर काही ठिकाणी या मशिनची माहिती असणारे वैद्यकीय अधिकारी देखील नाहीत.

सोर्स-गूगल

ग्रामीण भागातल्या याच समस्यांचा विचार करून, भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी हे क्रेडीट कार्डच्या आकाराचं टेली-इसीजी मशिन बनवलंय. या मशिनच्या माध्यमातून हृदयाच्या ठोक्यांची माहिती मोबाईलवर उपलब्ध होवू शकते, ज्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यास मदत होईल. विदेशी मशिन्स जास्त महाग आणि वजनानेही जास्त आहेत. त्यांच्या तूलनेत भारतीय बनावटीचं हे इसीजी मशिन फक्त ४ हजार रूपयांचं, आणि सर्वात छोटं आहे.

हे मशिन मोबाईलच्या चार्जरने चार्ज होतं, आणि या मशिनमधून जगाच्या कोणत्याही कोप-यात स्पेशलिस्ट डॉक्टरकडे ईसीजीची माहिती पाठवता येते.

डॉ हेमंत हळदवणकर, चेस्ट फिजीशिअन सांगतात,“या मशिनच्या माध्यमातून मिळणारी ईसीजीची माहिती चांगली आहे. हे मशिन दोन-तीन वेळा तपासणीसाठी आणि पाहण्यासाठी माझ्याकडे देण्यात आलं होतं”.

या प्रोजेक्टवर काम करणा-या भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या (बार्क) टीमधल्या सदस्य विनिता सिन्हा यांच्या म्हणण्याप्रमाणे,“या मशिनची किंमत फार कमी आहे, एकदा पूर्ण चार्ज केल्यांतर 300 ईसीजी काढता येतात. हे मशिन निश्चितपणे देशातल्या ग्रामीण,अतिदुर्गम भागात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वापरता येईल,”.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter