शरीरातील कॅल्शिअमचे संतुलन ठेवून राहा फिट

शरीरातील कॅल्शिअमचे संतुलन ठेवून राहा फिट
सोर्स-गुगल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मानवी शरीरासाठी कॅल्शियम फार गरजेचं आहे. संपूर्ण शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम उपयुक्त असते. कॅल्शियमुळे शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास टळतो. यामुळे नसांचे व्यवस्थितपणे कार्यरत राहतात. धावपळीच्या जीवनशैलीत कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. सर्वसाधारपणे मानवी शरीराला कॅल्शियमची १२०० मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते. मात्र शरीरात हव्या तितक्या प्रमाणात कॅल्शियमची निर्मिती होत नसल्याने आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असणं गरजेचं असतं.

 मानवी शरीरात पुरेसे कॅल्सियम असल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय पचन व्यवस्थित होऊन पाठीचा कणा देखील व्यवस्थित राहतो. कॅल्शियममुळे शरीरातील अतिरिक्त फॅट बाहेर निघून जाण्यास मदत होते.

आहारात रोज शर्करायुक्त पदार्थांमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. मानवी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरतील कॅल्शियम कमी झाले की दात आणि हाडं कमकुवत होतात. तसेच स्नायूदेखील दुखावतात. त्यासोबतच नखे आणि डोकेदुखी होण्याची शक्यता असते.

शरीरातील कॅल्शियचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करावा.

पालेभाज्या

कॅल्शियम मेंटेन करा आणि फीट राहा

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा

दूध

कॅल्शियम मेंटेन करा आणि फीट राहा

दूध हे कॅल्शियचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे दिवसभरातून एकदा तरी ग्लासभर दूध पिणे फायदेशीर ठरते.

दही

कॅल्शियम मेंटेन करा आणि फीट राहा

दह्यातून शरीराला ४५० मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते. म्हणून रोजच्या आहारात एक वाटी दह्याचे सेवन करावे.

गाजर

कॅल्शियम मेंटेन करा आणि फीट राहा

गाजरामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे गाजर खाणे गरजेचे आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter