चहाची चाहत आरोग्यास घातक

चहा ही भारताला इंग्रजांची देण. पण सध्या चहा भारतीयांमध्ये इतका लोकप्रिय झालाय...की आपल्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. मात्र, असा हा लोकप्रिय चहा शरीरासाठी घातकच आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात चहाचे प्रमाण किती असावे हे ठरवणे गरजेचे आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रिकाम्या पोटी चहा पिणे अत्यंत त्रासदायक आहे. हा चहा पोटातील पाचक रसांवर प्रभाव टाकतो. यामुळे पचनक्रिया कमकुवत होते. आणि भूक लागण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. यामुळे आपल्याकडून कमी अन्न खाल्ले जाते.

अति उकळलेला चहा आरोग्यासाठी आणखीनच घातक. अति उकळलेल्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण वाढल्याने पित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी यासारखे आजार होतात. तसेच पोटात किंवा श्वासनलिकेत जळजळ होऊ शकते.

बैठे काम करणाऱ्यांना सततच्या चहामुळे मधुमेह, हृदविकार, लठ्ठपणासारखे आजार जडतात. कोरा चहा आरोग्यासाठी चांगला. मात्र याच्या अतिरिक्त प्रमाणातील सेवनामुळे रक्तदाब वाढणे, पक्षाघात होणे, शुक्राणूंची संख्या कमी होणे, असे विकार होऊ शकतात.

दूध, साखर आणि चहाची पावडर एकत्र करून उकळलेला चहा कफ आणि पित्त वाढवणारा आहे.

एकूणच चहा आणि कॉफी शरीरासाठी घातकच. पण काहीवेळा चहा पिणे शरीराला फायदेशीर ठरू शकते. चहामध्ये अँटिऑक्सिडंट आणि कॅफेन हे दोन्ही घटक असतात. यातील कॅफेन शरीरास घातक असते तर, अँटिऑक्सिडंट शरीरास फायदेशीर असते. अँटिऑक्सिडंटमुळे शरीरातील पेशींचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच काहीवेळा चहा पिणे फायदेशीर असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter