केस धुताना काय काळजी घ्याल?

केस धुताना काय काळजी घ्याल?
सोर्स -FashionLady
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या केसांचे पोषण होणे हे फार आवश्यक असते. केसांना योग्य प्रमाणात पोषण न मिळाल्यास केसांसंबंधीच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे केसांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

केसांना धुतल्यानंतर त्यांचं पोषण होणं हे जास्त गरजेचं असतं. त्यासोबतच केसांना धुण्याआधी तेलाने मसाज करावा. यामुळे केसांना हवे ते पोषणही मिळते.

केस धुण्याअगोदर या गोष्टी लक्षात ठेवा

  • एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी कोणत्याही दोन तेलांचे मिश्रण करून त्यामध्ये ‘ई’ व्हिटॅमिनची कॅप्सूल घालावी. या मिश्रणाने केसांना पोषण मिळेल शिवाय केसगळती थांबण्यास मदत होईल.
  • केस धुण्यासाठी केव्हाही कडकडीत पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्याने केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता असते.
  • केस धुण्याअगोदर केसांना दही आणि अंड्याचे मिश्रण लावणे फायद्याचे असते. याला नैसर्गिक कंडिशनर मानलं जाते.
  • केसांना धुण्याआधी मध आणि दही यांचे मिश्रण लावावे. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter