मसाले : स्वयंपाक घरातील औषधं

आपल्या स्वयंपाक घरात असे पदार्थ आहेत, ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. मसाले म्हणजेच स्वयंपाक घरातील औषधं. ही औषधं कडू लागत नाही, तर जेवण अधिक रुचकर करून आपलं आरोग्य सुदृढ करतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मसाले… भारताचा चविष्ठ गाभा. या मसाल्यांचा भारतातून पूर्वेकडच्या देशांमध्ये व्यापार व्हायचा. या व्यापारासाठीच अरबांनंतर पोर्तुगीज भारतात आले. परदेशात जेवणाला विशेष चव आणण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जायचा. पण भारतात जेवणाला फक्त चव आणण्यासाठीच नव्हे, तर औषध म्हणून या मसाल्यांचा वापर पूर्वापार होतोय.

मसाले म्हणजे स्वयंपाक घरातील औषधं होय. मसाल्यातील विविध पदार्थांपासून तेल, मलमही बनवले जातात. शरीर लेपन, धूप म्हणूनही मसाले वापरले जातात. यातील काही मसाल्यांच्या औषधी गुणधर्माची आपण ओळख करून घेणार आहोत.

हिंग : फेरुला नावाच्या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. श्वसनाचे आजार, पोटदुखी, मासिक पाळीत हिंग उपयोगी पडते. हिंगात अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक असतात ज्यामुळे पोट साफ होते. लहान मुलांच्या पोटावर (बेंबीच्या आजूबाजूला) हिंगाचा लेप लावल्यास पोटदुखी कमी होते. हिंग सेवनामुळे शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते.

हळद : मसाल्यातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ. हळदीचे अनेक फायदे आहेत. हळदीबाबत प्रचलित म्हण आहे, ‘पी हळद आणि हो गोरी.’ लग्नात वधू-वरांना हळद लावली जाते. ती फक्त मनोरंजन म्हणून नाही तर, हळदीमुळे त्वचेचे आजार बरे होतात. तसेच किडनी, रक्त, हृदयाशी संबंधित आजार बरे होतात. तसेच चहात हळद चाकून प्यायल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. घसा दुखत असल्यास हळद पावडर घशात टाकावी, आराम मिळतो.

काळी मिरी : काळीमिरी हा मसाल्यातील तिखट पदार्थ. मात्र यात आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, विटामिन ‘ए’ आणि ’सी’ उपलब्ध असते. काळीमिरी खाल्ल्याने स्नायूंना बळकटी येते, तसेच जखम लवकर बळी होते. तेल आणि साखरेतून काळीमिरी पावडर लावल्यास चेहेरा उजळतो.

तमालपत्र : तमालपत्रामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांना पसरवण्यापासून थांबवते. तालपत्रातही आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंकचे घटक उपलब्ध असतात.

लवंग : लवंग वजन कमी करण्यात मदत करते. तसेच गॅस, अपचन यासारख्या त्रासातही उपयोगी पडते. दात दुखत असल्यास लवंग दाढेखाली ठेवले जाते. घसा दुखत असल्यास, कफ झाल्यास लवंगचा वापर करावा.

जिरे : जिऱ्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी 2 प्रकार आपल्या रोजच्या वापरात आहेत. सफेद जिरे आणि शहाजिरे. जिर्‍यात प्रथिनं व स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त असते. यामुळे जिरे बुद्धिवर्धक, पित्तशामक, बलवर्धक, कफनाशक आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. पोट फुगणं, पोटात वायू होणं, उलटी, अतिसार, कृमी या सर्व विकांरावर जिरे गुणकारी समजले जाते. जिऱ्यात झिंक आणि मिनरल असते. जिऱ्यामुळे शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते.

मोहरी : मोहरीच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्वचा विकार, अर्धांगवायू, संधिवात, आमवात, खांदा जखडणे, मान-गुडघ्याचे विकारांवर याचा वापर होतो. हिवाळ्यात मोहरीचं तेल जेवणात वापरणे फायदेशीर आहे. उचकी, कफ, दमा, खोकल्यावर मोहरीचा काढा द्यावा. एखाद्या ठिकाणी गाठ अथवा सूज आली असेल तर त्यावर मोहरीचा लेप लावावा.

वेलची : सुवासिक वेलची शुक्राणूवर्धक आहे. त्याचबरोबर ती शरीरात थंडावा निर्माण करते. अजीर्ण झाल्यास, ढेकर येत असल्यास वेलची खावी. कोरडा खोकला आणि आवाज बसल्यास वेलची खावी. योनीतून रक्तस्राव होणे, उलटी होणे, उचकी लागणे यावर वेलची उपयुक्त ठरते.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter