गरोदरपणात साखऱ किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने बाळाला लहान वयात अस्थमा होण्याचा धोका संभवू शकतो. एका संशोधनानुसार संशोधकांना हे लक्षात आलंय.
याआधी केलेल्या संशोधनांनुसार चुकीचा आहार आणि लठ्ठपणा या गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये अस्थमा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मॅसाचुसेट विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात १०६८ आई-मुलांवर संशोधन करण्यात आलं. या संशोधनात मातांनी गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यात किती साखरयुक्त पेय घेतली याची नोंद करण्यात आली. यासोबतचं मुलं घेत असेलल्या आहाराची तसंच साखरयुक्त पेयांचीही नोंद करण्यात आली. याद्वारे किती साखरेचं सेवन केलं यांची माहिती घेण्यात आली.
या संशोधनाच्या अखेरीस असं लक्षात आलं की, ज्या महिला गरोदरपपणात अतिरिक्त साखर किंवा सारखरयुक्त पदार्थांचं सेवन करत होत्या त्यांच्या मुलांना ६० टक्के अधिक अस्थमाचा होण्याचा धोका होता. तसंच जी मुलं लहानपणी अति साखरेचं सेवन करत होती त्यांना अस्थमा होण्याचा धोका ६४ टक्क्यांनी वाढला होता.
या संशोधऩाचे मुख्य अभ्यासक रिफास शिमान यांच्या सांगण्यानुसार, “गरोदरपणात महिलांनी साखर किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळलं तर पोटातील बाळाला अस्थमा होण्याचा धोका कमी होतो.”