‘टीबी’मुक्त मुंबईसाठी पालिकेचा रोडमॅप तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून टीबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारताचं लक्ष ठेवलंय. पण, टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेनेही कंबर कसलीये. टीबीबाबतची जनजागृती आणि उपाययोजना यावर पालिकेने लक्ष केंद्रीत केलंय

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

टीबी जगासमोर एक मोठं आव्हान आहे. मुंबईत दिवसेंदिवस औषधांना दाद न देणाऱ्या टीबी रुग्णांची संख्या वाढतेय. जानेवारी महिन्यातील सर्व्हेक्षणात ३०४ नवीन टीबी रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेने एक रोडमॅप तयार केलाय.

टीबीमुक्त मुंबईचा पालिकेचा रोडमॅप

  • टीबीच्या जनजागृतीसाठी अनिमेशन चित्रपट तयार करण्यात आलाय. या चित्रपटाच्या माध्यामातून जनजागृती
  • टीबीबाबत माहिती देणारे बॅनर्स मध्ये आणि हार्बर रेल्वेच्या १५ स्थानकांवर लावण्यात आले
  • रेडियो चॅनल्सवर टीबीबाबत जनजागृतीचा संदेश देणार
  • मुंबईतील १० मोठ्या मॉल्समध्ये स्टॅन्डिजच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न

पालिकेचा टीबी प्रोग्राम २०१७

  • १८,००० संशयीत रुग्णांना पालिकेतर्फ खासगी रुग्णालयात मोफत एक्स-रे सुविधा
  • ८ नवीन कॅब-नॅट मशिन बसवण्यात आल्यात. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आता २८ कॅब-नॅट मशिन्स उपलब्ध. आत्तापर्यंत ७२ हजार लोकांची चाचणी
  • १५० केमिस्टच्या माध्यमातून टीबी रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली. याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न
  • मुंबईत टीबी रुग्णांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. ६,६०० पेक्षा जास्त संशयीतांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली

मुंबईती टीबी रुग्णांची माहिती

  • साल २०१७ मध्ये सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातून ४५,६७५ टीबी देणाऱ्या रुग्णांची माहिती मिळाली. खासगी रुग्णालयांमध्ये जनजागृती झाल्याने जास्तीत-जास्त माहिती मिळतेय.
  • 4,891 औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण, तर 670 एक्स-डी-आर म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण आढळून आले
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)