पन्नाशीनंतर घ्या आरोग्याची खास काळजी, पुरुषांसाठी आवश्यक चाचण्या

सोर्स- इंडिया.कॉम
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

जसजसे वय वाढत जाते त्यासोबत मानवी शरीर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढत जाते. पुरूषांनी रोग होऊ नये यासाठी आपण नेहमीच दक्ष राहणं गरजेचं असतं. यासाठी वेळोवेळी वैद्यकिय चाचण्या करून घेणे आवश्यक असते. नियमितपणे वैद्यकिय तपासण्या केल्याने अनेक गंभीर आजार तसेच विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी  वयाच्या पन्नाशीनंतर या वैद्यकिय चाचण्या करून घेणे फायदेशीर ठरेल.

 रक्तदाब चाचणी

ह्रदयाच्या निरोगी आयुष्यासाठी नियमितपणे रक्तदाबाच्या चाचण्या करून घेणे गरजेचे असे. यामुळे ब्रेन स्टोक, ह्रदयरोग तसेच रक्तदाबाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

 ब्लड कोलेस्ट्रॉल टेस्ट

निदान वर्षातून एकदा तरी ब्लड कोलेस्ट्रॉल टेस्ट करून घ्यावी. यामउल उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आजारापासून सतर्क राहण्यास मदत मिळते. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे ही चाचणी करून घ्यावी.

 ब्लड ग्लुकोज टेस्ट

पुरुषांना वाढत्या वयानुसार मधुमेहाचा धोका वाढत जातो. त्यामुळे शरीरामधील रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. या चाचण्यांमुळे मधुमेह तसेच मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून रक्षण होण्यास मदत होईल.

 मलाशय परिक्षण

या परिक्षणाद्वारे प्रोटेस्ट कॅन्सर तसेच मलाशयाचा कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. शिवाय याच्या परिक्षणातून आतड्यांमधील रक्तस्त्रावाची माहिती मिळते.

 डोळ्यांची तपासणी

पुरुषांना वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी नियमितरित्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींनी डोळ्यांची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

 तोंडाची तपासणी

धुम्रपान अथवा तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींनी तोंड, घसा आणि दातांची तपासणी करून घ्यावी. अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका संभवतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter