ताण-तणावावर मात करण्यासाठी योग करा

योगाच्या माध्यमातून शरीर लवचिक होण्यास त्यासोबचं शरीरातून अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते. तसंच दररोजचा ताण–तणाव देखील योगामुळे कमी होतो.

0
58
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वजन कमी होणं, शरीर लवचिक होणं, उजळदार त्वचा आणि चांगलं आरोग्य या गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात. यासाठी एक उपयुक्त मार्ग म्हणजे योग. शिवाय आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील योगाचं खूप जास्त महत्त्व आहे.

योगाच्या माध्यमातून शरीर लवचिक होण्यास त्यासोबचं शरीरातून अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते. तसंच दररोजचा ताण–तणाव देखील योगामुळे कमी होतो.

योगामुळे ताण कमी होतो

जेव्हा तुमच्या डोक्यात असंख्य विचार असतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो तेव्हा हळूहळू दीर्घ श्वास घ्या. योगाच्या माध्यमातून श्वास घेण्याची योग्य पद्धत समजण्यास मदत होईल. योगा केल्याने टॉक्सिन निघून जाण्यास मदत होते. टॉक्सिन बाहेर जातं म्हणजे फक्त शरीरातील टॉक्सिन बाहेर न जाता तुमच्या विचारांमधील टॉक्सिन देखील बाहेर पडण्यास मदत होते.

योगामधील प्रत्येक आसन हे आपल्यासाठी फायदेशीर असतं. हेच य़ोगाचं खरं महत्त्व आहे. जर आपण सुखासनाचा विचार केला तर हे फार सोपं आसन आहे. या आसनामध्ये सरळ ताठ बसून हात मांडीवर ठेवत दीर्घ श्वास घ्यायचा. यामुळे मनातल्या शांती मिळते तसंच महिलांना मासिक पाळीच्या काळातील वेदना कमी होतात. यासोबतचं चिडेचिडेपणा देखील कमी होण्यास मदत होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter