हेअर ड्रायरचा वापर करताय… तर सावधान!

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केसांच्या नव-नव्या स्टाईल करण्यासाठी मुली केसांवर विविध कृत्रिम उपायांचा मारा करतात. हवे तेव्हा केसांना कुरळे करायचे, हवे तेव्हा सरळ करायचे किंवा याहून जास्त म्हणजे केसांना कलर करायचे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे सर्व करताना वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमुळे केसांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. केसांचे नुकसान होऊ शकतं.

केसांना वारंवार धुवून त्यांना हेअर ड्रायरच्या सहाय्याने सुकवणे, हेही तितकेच घातक आहे. फक्त पार्लरमध्येच नाही तर बऱ्याच वेळा मुली घरच्या घरी हेअर ड्रायरच्या सहाय्याने केस सुकवतात. यामुळे वेळ वाचतो, मात्र अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, असं केल्याने केसांची फार मोठ्या प्रमाणात हानी होते.

असे म्हणतात की, वारंवार केस धुवू नयेत. पण केस वारंवार धुण्यापेक्षा हेअर ड्रायरच्या मदतीने केस सुकवल्यास दहापटीने अधिक नुकसान होते.

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा हेअर आयर्निंग या उपकरणांचा वापर केल्याने केसांचं कधीही भरून न निघणारं नुकसान होतं. हेअर ड्रायर तसेच आयर्निंग सारख्या उपकरणांमधून येणारी गरम हवा केसांना नुकसानदायक असते. या हवेचे तापमान अतिशय जास्त असते; त्यामुळे केसांचं नुकसान होतं. या तापमानामुळे केसांमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केसाला हानी पोहोचू शकते. केसांवरती एक विशिष्ट प्रकारचं आवरण असतं. ज्यातून केसांना मऊपणा आणि ओलावा मिळतो. हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे हा ओलावा कमी कमी होत जातो. ज्यामुळे केस तुटतात किंवा केसांवर ताण येण्याची शक्यता असते. तसेच केस कोरडे पडतात आणि केसांना फाटे फुटतात.

त्यामुळे अशा उपकरणांचा शक्यतो वापर करू नये. केसांना नैसर्गिकरित्या सुकवणेच उत्तम.

कशी घ्याल ओल्या केसांची काळजी

  • केस धुतल्यावर टॉवेलने हळूहळू पुसावेत.
  • ओल्या केसांवर जास्त काळ टॉवेल बांधून ठेवू नये.
  • केस वाळवण्यासाठी नैसर्गिक हवेचा वापर करावा.
  • ओले केस लगेचच विंचरू नये.
  • ओले केस लगेचच बांधू नये.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter