आजारांपासून दूर राहण्यासाठी सुकामेवा खा!

सुकामेवा खाल्ल्याने हृदयाचे आजार, कॅन्सर आणि लठ्ठपणा यासांरख्या आजारांचा धोका कमी होतो. नकुत्याच केलेल्या एका संशोधनानुसार असं स्पष्ठ करण्यात आलंय. संशोधकांच्या सांगण्यानुसार, सुकामेवा याला सुपर फूड समजलं जातं. कारण यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं.

nuts and seed collection (cashew, pecan, hazelnut,pine nuts, peanut, pumpkin) in an old typesetter wooden drawer
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उत्तम बुद्धीसाठी सुकामेवा खा असं सांगतात. मात्र तुम्हाला माहित आहे का सुकामेवा खाल्ल्याने हृदयाचे आजार, कॅन्सर आणि लठ्ठपणा यासांरख्या आजारांचा धोका कमी होतो. नकुत्याच केलेल्या एका संशोधनानुसार असं स्पष्ठ करण्यात आलंय.

या संशोधनाचे सह-अभ्यासक आणि लंडनच्या पब्लिक हेल्थ इंपेरियल कॉलेजचे डॅगफीन यांच्या सांगण्यानुसार, सुकामेवा खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो असं आमच्या संशोधनातून समोर आलंय.

हे पडताळून पाहण्यासाठी ८,१९,००० लोकांवर अभ्यास केला. यामध्ये समावेश कऱण्यात आलेल्या १२,००० व्यक्तींना हृदयाचे आजार, ९,०००  व्यक्तींना स्ट्रोक तर १८,००० व्यक्तींना हृदयाचे आजार आणि कॅन्सर होता.

जर्नल बीएमसी मेडिसीन टुडेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार, दररोज थोड्या प्रमाणात सुकामेवा खाल्ला तरी हृदयाच्या आजारांचा धोका ३० टक्क्यांनी कॅन्सरचा धोका १५ टक्क्यांनी तर अकाली मृत्यूचा धोका २२ टक्क्यांनी कमी होतो. इतकचं नाही तर मधुमेह आणि श्वसनाच्या आजारांचा धोकाही कमी होतो असं स्पष्ट करण्यात आलंय.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, सुकामेवा याला सुपर फूड समजलं जातं. कारण यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं.

डॅगफीन पुढे म्हणाले की, “हृदयाचे आजार, स्ट्रोक आणि कॅन्सर या आजारांमुळे अनेक मृत्यू होतात. सुक्यामेव्यातील काही पदार्थांमध्ये जसं की अक्रोडमध्ये अन्टीऑक्सिडंटचं भरपूर प्रमाण असतं. ज्यामुळे ताण कमी होतो आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)