टीबी जगासमोर एक मोठं आव्हान आहे. मुंबईत दिवसेंदिवस औषधांना दाद न देणाऱ्या टीबी रुग्णांची संख्या वाढतेय. जानेवारी महिन्यातील सर्व्हेक्षणात ३०४ नवीन टीबी रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेने एक रोडमॅप तयार केलाय.
टीबीमुक्त मुंबईचा पालिकेचा रोडमॅप
- टीबीच्या जनजागृतीसाठी अनिमेशन चित्रपट तयार करण्यात आलाय. या चित्रपटाच्या माध्यामातून जनजागृती
- टीबीबाबत माहिती देणारे बॅनर्स मध्ये आणि हार्बर रेल्वेच्या १५ स्थानकांवर लावण्यात आले
- रेडियो चॅनल्सवर टीबीबाबत जनजागृतीचा संदेश देणार
- मुंबईतील १० मोठ्या मॉल्समध्ये स्टॅन्डिजच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न
पालिकेचा टीबी प्रोग्राम २०१७
- १८,००० संशयीत रुग्णांना पालिकेतर्फ खासगी रुग्णालयात मोफत एक्स-रे सुविधा
- ८ नवीन कॅब-नॅट मशिन बसवण्यात आल्यात. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आता २८ कॅब-नॅट मशिन्स उपलब्ध. आत्तापर्यंत ७२ हजार लोकांची चाचणी
- १५० केमिस्टच्या माध्यमातून टीबी रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली. याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न
- मुंबईत टीबी रुग्णांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. ६,६०० पेक्षा जास्त संशयीतांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली
मुंबईती टीबी रुग्णांची माहिती
- साल २०१७ मध्ये सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातून ४५,६७५ टीबी देणाऱ्या रुग्णांची माहिती मिळाली. खासगी रुग्णालयांमध्ये जनजागृती झाल्याने जास्तीत-जास्त माहिती मिळतेय.
- 4,891 औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण, तर 670 एक्स-डी-आर म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण आढळून आले