छाती आणि पोटावरच्या अतिरिक्त केसांमुळे चिंतीत? हे उपाय वापरा

काही पुरुषांच्या शरीरावर अतिरिक्त प्रमाणात केसांची वाढ होते. छातीवर आणि पाठीवर केस वाढतात. जाणून घ्या, या समस्येच्या उपायांबाबत..

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पुरुषांमध्ये प्रामुख्यानं आढळून येणारी समस्या म्हणजे छातीवर आणि पाठीवर असणारे जास्तीचे केस. अनेक पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे शारीरिक हानी होत नसली तरीही अतिरिक्त केसांची वाढ सौंदर्यासाठी घातक ठरू शकते.

वयात येण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मुलांना दाढी-मिशा यायला सुरुवात होते. त्यासोबतच त्यांच्या छाती आणि पाठीवरही केस येतात. केस येण्याचं हे प्रमाण बहुतेक वेळा अनुवंशिकतेवर अवलंबून असतं. काहींना हार्मोन्सच्या असंतूलनामुळे अतिरिक्त केस येऊ शकतात. अँड्रोजन नावाचा हार्मोनटा समुह अतिरिक्त केसांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. या समुहामध्ये पुरुषांमध्ये असणाऱ्या टेस्टोस्टेरोनचाही समावेश आहे. छाती आणि पाठीवरच्या केसांची अतिरिक्त वाढ काहींसाठी लाजिरवाणीही ठरु शकते.

या अतिरिक्त केसांपासून सुटका करुन घेण्यासाठी हे उपाय वापरा.

रेझर किंवा वॅक्सिंग

विरळ स्वरुपात असणाऱ्या केसांना रेझरच्या मदतीनं काढता येऊ शकतं. तसंच वॅक्सिंगचा वापर करुनही हे केस काढले जाऊ शकतात

हेअर रिमुव्हल क्रीम

वॅक्सिंगने केस काढणं वेदनादायक ठरू शकतं. हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करणं वेदनारहित ठरेल

लेजर ट्रिटमेंट

या केसांपासून कायमची मुक्तता हवी असल्यास लेजर ट्रिटमेंट फायदेशीर ठरु शकते.

अतिरिक्त केसांच्या वाढीसंदर्भातला ‘हायपरट्रायकोसीस’ हा आजार आहे. या आजारामध्ये संपुर्ण शरीरावर अस्वलाच्या अंगावर असतात तसे केस येतात. वेअरवुल्फ आजारही म्हटलं जातं. हा आजार पुरुष तसंच स्त्रियांमध्येही आढळतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter