उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच घामाच्या धारा लागतात. मात्र ही घामाची समस्या पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. घाम येऊन त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात आणि शरीरावर येणाऱ्या घामाला दुर्गंधी येते. जर पुरूषांना जास्त घाम येत असेल तर बुरशीच्या संसर्गाची शक्यता वाढते. त्य़ामुळे शरीरावर ज्या ठिकाणी घाम जास्त येत असेल त्या ठिकाणची काळजीपुर्वक स्वच्छता केली पाहिजे.
पुरुषांना अति घाम येण्याची कारणे
- कडक उन्हात फिरल्याने अथवा काम केल्याने घाम येतो.
- शरीरात रक्तशर्करेचे प्रमाण कमी झाल्याने घाम येण्याची शक्य़ता असते.
- स्थूलपणा, थायरॉईडची समस्या यामुळे देखील अतिघाम येण्याची असते.
- आहार जर पोषक तत्वांची कमतरता असल्यास अतिघाम येण्याची शक्यता वर्तवली जाते.
- अस्वच्छ जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवू शकते.
- शारीरीक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने हा त्रास होऊ शकतो.
घरगुती उपाय
- कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा लेप घाम येतो त्या ठिकाणी लावावा . काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे.
- लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. याने घामामुळे निर्माण झालेले बॅक्टेरिया मरतात. तसेच त्यामुळे त्वचेचं संतुलन देखील सुधारते.
- आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल मिसळून अंघोळ केल्याने घाम येण्यास प्रतिबंध होण्यास मदत होते. तसेच घामामुळे येणारी दुर्गंधी नाहिशी होते.
- पुदिन्याची पाने पाण्यात टाकून ते पाणी गरम करावे. हे पाणी अंघोळीच्या पाण्यासोबत मिसळल्याने घाम येण्यापासून सुटका होते.
- अॅपल व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सीडंट असतात ज्यामुळे बॅक्टेरिया दूर होतात. पाण्यामध्ये अर्धा कप हे व्हिनेगर टाकून याचा वापर करावा. अति घामाच्या समस्येपासून दूर राहता येईल.
- घाम जर फार येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. साध्या- सोप्या उपयांनी देखील या समस्येपासून सुटका होऊ शकते.