साधारणपणे टक्कल पडण्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचं दिसून येतं. यासाठी पुरुषांमध्ये असलेले हार्मोन्स कारणीभूत आहेत. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं अनेक पुरुषांना ग्रासलेलं आहे. या समस्येचं मुळ कारण ऐस्ट्रोजेनेटिक एपोलिका आहे. या क्रियेमुळे, पुरुषांमध्ये असणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या उद्भवते. जाणून घ्या टक्कल पडण्यामागची आणखी कारणं..
टक्कल पडण्याची कारणं
- तंबाखू आणि धुम्रपानाच्या सेवनामुळे केस गळती संभवते
- अति प्रमाणात दारूचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्झिनचे प्रमाण वाढते. शिवाय शरीरातून लोह आणि पाण्याची पातळी कमी होते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होईन केसांना हानी पोहोचते आणि केस गळू लागतात.
- अनुवंशिक कारणांमुळे देखील पुरूषांचे केस गळतात
- ताणतणाव, ह्रदयविकार तसेच थायरॉईड यांसारख्या आजारांवरील औषधोपचारांचा परिणाम केसांवर पडतो आणि केस गळती सुरु होते.
- आहारात लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो.
- हेअर कलर्स, शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये असलेल्या केमिकल्सचा परिणामांमुळे पुरूषांचे केस गळतात
- फंगल इन्फेक्शन तसेच डोक्यात होणारा कोंडा या बाबी देखील केस गळतीला कारणीभूत ठरू शकतात.
- अनुवांशिक कारणांमुळे केस गळतीची समस्या ओढावू शकते.
केसगळतीवर पुरूषांनी हे उपचार करावे
- एक मोठा कांदा घेऊन तो कापा. ज्या भागातील केस गळाले आहेत. त्या ठिकाणी कांदा चोळा. काही दिवसांनंतर केसगळती थांबण्यास मदत होईल.
- ज्येष्ठमध वाटून घ्या. त्यामध्ये थोडे दूध आणि केसर मिक्स करून त्याची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला लावा. सकाळी केस धूऊन टाका.
-बदाम आणि खोबरेल तेल समप्रणामात घ्या. या मिश्रणाने केसांना मसाज करा. त्यानंतर काही काळाने केस धुवून टाका.
-मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण लावल्याने केसांना पोषण मिळते शिवाय केसांची उत्तम प्रकारे वाढ होते.