मासिक पाळीतील अनियमितता
- हा त्रास प्रत्येक वयोगटातील महिलांना होतो. यामध्ये बरेच दिवस रक्तस्राव होणं, अतिप्रमाणात किंवा खूप कमी रक्तस्राव होणं, पाळी उशीराने किंवा वारंवार येणं हे त्रास उद्भवतात.
- कुमारवयीन मुलींमध्ये अनियमित रक्तस्राव होण्यामागे पॉलिसीस्टिक ओवरियन डिसीज, थायरॉईड, अंडाशयात निर्माण होणारे सीस्ट किंवा रक्तस्रावाचा त्रास ही कारणं असतात.
- प्रजननक्षम वयातील मासिक पाळीतील अनियमिततेला डिसफंक्शनल युटेरिअन ब्लीडिंग म्हटलं जातं. फायब्राईड्स, अंडाशयात गाठ होणं, मधुमेह आणि थायरॉईड ही कारणं असतात.
- अनियमित रक्तस्रावामागे बऱ्याचदा योनीमार्गाचा किंवा एंडोमेट्रिअमचा कर्करोग असण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांची भेट घ्यावी.
मूत्रमार्गात जंतूसंसर्ग (युटीआय-Urinary Tract Infection):
मूत्राशय आणि मूत्रमार्गात जंतूसंसर्ग होण्याच्या त्रास महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. पचन संस्थेतील ई.कोली. लहान मूत्रमार्ग आणि गुदद्वार आणि गुद्दाशयाशी येणाऱ्या संपर्कामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते. ओटीपोटाच्या किंवा योनीच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि काही वेळा शारीरिक संबंधांनंतर हा त्रास होतो.
यूटीआयची लक्षणं
- लघवी दरम्यान जळजळणं
- सतत किंवा तातडीने लघवीला जावंसं वाटणं
- लघवीचा रंग गडद होणं
- कंबर, ओटीपोटात दुखणं
- ताप
इतर गंभीर त्रास :
- महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग आणि योनीमार्गाच्या कर्करोगासोबत एंडोमेट्रिअम, अंडाशय, फुफ्फुस आणि त्वचेचा कर्करोगही आढळतो. चाळीशी किंवा पन्नाशीच्या वयोगटातील महिलांना हे त्रास उद्भवतात.
- नियमितपणे स्तनांची तपासणी करून किंवा २ ते ३ वर्षांनी मॅमोग्राफीच्या सहाय्याने स्तनांचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो.
- ओटीपोटाची नियमितपणे अल्ट्रासाऊंड तपासणी केल्यास एंडोमेट्रिअम आणि अंडाशयातील समस्या समजतात.
- योनीमार्गाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर चाचणी करावी.
डिप्रेशन :
- नैराश्याचा त्रास पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वैद्यकीय नैराश्य म्हणजेच क्लिनिकल डिप्रेशनमध्ये उदास, निराश वाटणं, आत्मविश्वास गमावणं आणि अत्यंत थकवा अशी लक्षणं जाणवतात.
- पाळी नव्याने सुरू होताना, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे नैराश्य येतं. याला प्रीमेन्युस्ट्रुअल सिंड्रोम, पोस्ट-पार्टम डिप्रेशन आणि रजोनिवृत्ती आणि त्यानंतरच्या काळात अँक्झायटी डिसऑर्डर असे म्हणतात.
लठ्ठपणा :
- स्थुलतेमुळे महिलांच्या आरोग्यावर फार नकारात्मक परिणाम होतो. लठ्ठ महिलांना मधुमेह, हायपरटेंशन, हृदयविकार आणि कमी वयात गुडघ्यांचा त्रास होतो.
- लठ्ठपणामुळे पॉलीसीस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), अनियमित मासिक पाळी, प्रसुतीपूर्व अतिरक्तस्राव आणि बाळंतपणात समस्या निर्माण होतात.
- स्थूल महिलांना एंडोमेट्रिअल, स्तन, योनीमार्ग आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यताही अधिक असते.