डोक्याला झालेल्या जखमेच्या जनजागृती दिनाचं औचित्य साधत फोर्टिस(मुलुंड, माहीम आणि नवी मुंबई) यांनी ट्राफीक विभागासोबत बाईक चालवणाऱ्यांना आणि रस्त्यावरील व्यक्तींना सुरक्षिततेचे धडे दिले. यामध्ये लोकांना हेल्मेट, सीटबेल्ट या गोष्टींची देखील माहिती देण्यात आली.
- वांद्रे, माहीम, शिवाजी सर्कल, नवी मुंबई, भांडूप-सोनापूर, नाहूर-ऐरोली इत्यादी ठिकाणच्या रस्त्यांवर ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती
- यावेळी बाईक चालवणाऱ्य़ांना तसंच रस्त्यावरील नागरिकांना ट्राफिकचे नियम आणि अपघात झाल्यास प्रथम करण्याचे उपचार याची माहिती दिली.
- रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता हा उपक्रम राबवण्यात आला. शिवाय अपघातात डोक्याला मार लागणं हे फार गंभीर असून सुरक्षित गाडी चालवण्याने अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची जाणीव करून दिली.
- अपघातादरम्यान डोक्याला गंभीर जखम होऊ नये यासाठी देखील हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा
या उपक्रमाबद्दल बोलताना माहीमच्या ट्राफीक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक निता फडके, सतिश गायकवाड वाशीचे ट्राफीक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि प्रकाश मनसुक मुलुंडच्या ट्राफीक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्या सांगण्यानुसार, “हा उपक्रम राबवण्या मागचा हेतू म्हणजे, साधे नियम पाळल्यामुळे रस्ते अपघात टाळता येऊ शकतात हे लोकांना सांगणं होतं.”
हिरानंदनी रूग्णालयाचे क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. चंदर्शेखर तुलसीगेरी म्हणाले, “प्रत्येक रस्ते अपघातील प्रकरणं ही गंभीर असतात. ही प्रकरणं वेळीच डॉक्टरांना हाताळावी लागतात. असा रूग्णांना तत्काळ उपचार द्यावे लागतात.”
एल.एस रहेजा रूग्णालयाचे अपघात आणि आपत्कालीन मेडिसीनचे प्रमुख डॉ. अमित नाबर म्हणाले की, “रस्ते अपघातात मेंदूला इजा होण्याची अधिक शक्यता असते आणि हे जीवावर ही बेतू शकतं. यासाठी ट्राफीकचे नियम पाळल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होऊ शकते.”
मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयाचे आपत्कालीन मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संदीप गोरे म्हणाले की, “अपघातात डोक्याला जखम होण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. (महिला ३० टक्के तर पुरुष 70 टक्के) यामध्ये देखील तरूण मुलं अधिक आढळतात. यासाठी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचाराचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.”