- केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी खास ‘सुविधा’ ही योजना सुरू केलीये
- सुविधा या योजनेच्या अंतर्गत महिलांसाठी १०० टक्के पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकीन बनवण्यात आलेत
- हे सॅनिटरी नॅपकीन्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून प्रत्येकी एका पॅडची किंमत २.५० रूपये असेल
- प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना या दुकानात २८ मे पासून हे सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध होतील
२८ मे पासून सरकारच्या जनऔषधी दुकानात महिलांना हे सॅनिटरी पॅड्स मिळतील. महिलांना या सॅनिटरी नॅपकीन्सचं १० रूपयाचं पॅकेट मिळेल. ज्यामध्ये ४ पॅड्स असतील. बाहेर अशा पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकीन्सची किंमत ३० ते ८० रूपये आहे.
देशातील ५८६ जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व ३,२०० जनऔषधी दुकानात हे पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स देण्यात येणारेत. हे सॅनिटरी नॅपकीन्स पर्यावरण पूरक असल्याने त्याची विल्हेवाट लावणं सोयीस्कर होईल.
या पॅड्सच्या लाँचिंग दरम्यान अनंत कुमार म्हणाले की, सुविधा, निरोगी आरोग्य आण स्वच्छता या तिन्ही गोष्टी विचारत घेऊन हे सॅनिटरी नॅपकीन्स तयार करण्यात आलेत.
महिलांसाठी विशेष महाराष्ट्र राज्य सरकारने दखील अस्मिता ही योजना सुरु केलीये. राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे ही अस्मिता योजना सुरू करण्यात आलीये. ग्रामीण भागातील महिलांना परवडणाऱ्या दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून अस्मिता योजना सुरु करण्यात आलीये.