अशा लावा मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी

लहानपणापसून मुलांना चांगल्या सवयी आणि शिस्त लावली जाते. यामध्ये लहान मुलांना खाण्याच्या सवयींबाबतही माहिती देणं आवश्यक आहे. मुलांनी योग्य आहार घेण्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आजकालच्या मुलांना बाहेरचे पदार्थ आणि जंक फूड खाण्याची सवय आहे. मात्र खाण्याची ही सवय मुलांच्या आऱोग्यासाठी घातक ठरू शकते. एकादा का मुलांना बाहेरच्या पदार्थांची चव लागली की मुलं घरातल्या पदार्थांकडे पाहत नाहीत.

0
26
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पालकांनी मुलांना खाण्याच्या बाबतीत योग्य त्या सवयी लावणं गरजेचं आहे. यासाठी पालकांनी या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं.

खाद्यपदार्थांवरील लेबल वाचण्यास सांगणं

खात असलेल्या खाद्यपदार्थांच्या मागे असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती वाचा. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कऱण्यास सांगा. जेणेकरून प्रत्येकाला हे समजेल की खात असलेले पदार्थ शरीरासाठी योग्य आहेत का?

मुलांना खाण्याविषयी चांगली उदाहरण द्या

जर तुम्ही घरी जेवण तयार करत असाल तर त्यामध्ये भाज्यांचा समावेश अवश्य करा. जेवताना मुलांसोबत जेवायला बसा. शिवाय ताकद मिळण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी या आहाराचा कसा फायदा होतो याबदद्ल मुलांना सांगा.

योग्य पदार्थांची निवड

घरात योग्य खाद्यपदार्थ आणून ठेवा. चिप्स, सोडा, ज्यूस यांसारखे पदार्थ घेणं टाळा. तुम्ही असं केल्याने मुलाला देखील योग्य पदार्थ निवडण्याची सवय लागेल.

कुटुंबासोबत जेवा

दिवसातून किमान दोन वेळा कुटुंबासोबत बसून खा. मुलांना खाली बसून खाण्याची सवय लावा. मुलांसोबत जेवायला बसल्यावर त्यांच्याशी वाद घालू नका किंवा त्यांना ओरडू नका. यामुळे मुलं तुमच्याशी इतर विषयांवर देखील खुलेपणाने बोलू शकतील.

बाजारात खरेदी करतेवेळी मुलांना सोबत न्या

पालकांसोबत बाजारात जाऊन खरेदी कऱण्याची मुलांना फार आवड असते. जेवणासाठी बाजारातून सामान विकत घेताना त्यामध्ये मुलांना देखील सहभागी करा. त्यांची मत जाणून घ्या. यामुळे तुमची मुलं खाण्याच्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात याची तुम्हाला कल्पना येईल.

खाण्याच्या वेळा निश्चित करा

सततच्या खाण्याने मुलांना अतिप्रमाणात खाण्याची सवय लागू शकते. यासाठी खाण्याच्या वेळा निश्चित करा. तुम्ही मुलांच्या स्नॅक्सच्या वेळी चिप्स किंवा बिस्किटं देण्यापेक्षा पोषक पदार्थ तयार केले पाहिजेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)