राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये थॅलेसेमियाची तपासणी मोफत होणार

थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १० ऑगस्टला आझाद मैदानावर धरणे आदोलन केलं होतं. त्यावेळी पालकांनी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. यामध्ये थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत करण्यात ही मागणी करण्यात आली होती.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांच्या मागण्य़ांचा विचार करता सध्या राज्यातील सहा ठिकाणी थॅलेसिमिया मायनर तपासणी मोफत स्वरूपात करण्यात आलीये. आणि त्यासोबतचं लवकरच राज्यातील १८ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिलीये.
थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १० ऑगस्टला आझाद मैदानावर धरणे आदोलन केलं होतं. त्यावेळी पालकांनी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची  भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. यामध्ये थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत करण्यात यावी त्यासोबतचं ती सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करण्यात यावी, शिवाय थॅलेसेमिया रूग्णांसाठी NAT टेस्ट रक्त मोफत मिळावी या मागण्यांचा समावेश होता.
शिवाय सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री देशमुख यांच्या सांगण्यानुसार, राज्यातील ठाणे, नाशिक, सातारा,अमरावती, केईएम रूग्णालय, मुंबई व बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या सहा ठिकाणी थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रत्येक स्त्री रोग तज्ञांकडे थॅलेसेमिया तपासणी बंधनकारक करावी, अशीमागणी जेखील संघटनेतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात स्त्री रोग तज्ञांची संघटना फॉक्सी यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असं देशमुख यांनी सांगितलं.
शिवाय थॅलेसेमिया ओैषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही देशमुख यांच्याकडून देण्यात आलेत.
थॅलेसेमिया रूग्णांना रक्त मिळण्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून स्वयंसेवी संस्थांच्या ५० निवडक रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांचे प्रतिनिधी उपलब्ध राहतील व ते रूग्णांना रक्त मिळवून देण्याची व्यवस्था करतील. असंही देशमुख यांनी सांगितलंय.
नजीकच्या म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतच्या अहवालानुसार  राज्यात थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. २०१२ मध्ये ३,६४० थॅलेसेमियाचे रुग्ण होते, त्या तुलनेत २०१७ मध्ये रुग्णांची संख्या ६,०७१वर जाऊन पोहोचली होती.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter